उलाढाल बेदाणा विक्रीतून ३७० कोटींची : पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा
पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवार ( दि. २६) रोजी संपन्न झाली. यावेळी बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती. बाजार समितीच्या सभागृहात हि सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
यावेळी सभापती हरिष गायकवाड प्रास्ताविक करताना म्हणाले की,शेतकरी हित नजरेसमोर ठेऊन या बाजार समितीची वाटचाल असुन वरचेवर बाजार समितीच्या उत्पन्ना मध्ये वाढ झालेली आहे. मागील वर्षभरात बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ३७० कोटी रुपयांची, डाळींब ८० कोटी, फळे व भाजीपाला ३६ कोटी रुपये, भुसार धान्य रू.२१ कोटी रुपये, कांदा रू.१२ कोटी, जनावरे रू.५ कोटी, केळी रू.३ कोटी, वैरण रू.१ कोटी अशी एकूण वार्षिक उलाढाल ५२८ कोटी रुपयांची झालेली आहे.
या उलाढाली मधुन रू ४.४० कोटी उत्पन्न बाजार समितीस मिळालेले आहे. बाजार समितीने शॉपिंग सेंटर गाळे, आडत व्यापारी गाळे, सौदे कामकाज करिता सेलहॉल, स्वच्छतागृहाची सोय, पिण्यांचे पाण्यासाठी आर.ओ. प्लॅन्ट, बाजार आवार वॉल कंपाउंड, ६० मे.टनी वजनकाटा इत्यादी विविध विकास कामे केलेली असुन बाजार आवारात सि.सी.टी. व्ही यंत्रणा बसविणे, फळे व भाजीपाला मार्केट साठीचे गाळे, डाळींब मार्केट करिता काँक्रीटीकरण करणे, कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा उभारणी करणे, सौर उर्जा प्रकल्प, रस्ते, शॉपिंग सेंटरचे वरील मजल्याचे बांधकाम, शेतकरी भवन, पेट्रोल पंप. इत्यादी कामे व इतर सोयी सुविधा करण्याचा विचार आहे. सुरूवातीस बाजार समितीचे उपसभापती राजुबापू गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
सर्वाधिक शेतमाल विक्री : या शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा सत्कार
बाजार समितीकडे जास्तीत जास्त शेतीमाल विकी केल्याबद्दल शेतकरी विक्रम डोंगरे ( रा.आढेगांव ता. मोहोळ ), अभिमन्यु जाधव, (रा. जाधववाडी ता. पंढरपूर ), रेवणनाथ पाटील ((रा. घोटी ता. करमाळा),हणमंत झगडे (रा. जळोली ता. पंढरपूर), जालींदर बनकर, (रा. पिसेवाडी ता. माळशिरस),सुरज दोशी (रा. गादेगांव ता. पंढरपूर),मारूती रूपनर, (रा.महिम ता. सांगोला), आकाश थिटे (रा. भोसे ता. पंढरपूर) यांचा व जास्तीत जास्त बेदाणा शेतीमाल विक्री केल्याबद्दल प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बेदाणा असोसिएशन, पंढरपूर चे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, तसेच विनीत अशोक बाफना, संजय मस्के,धनंजय गाडेकर, अशोक शिंदे, सचिन गंगथडे, राहुल देवकर, राजकुमार फडे, प्रो. अनिलकुमार फडे यांचाही सन्मान करण्यांत आला. यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व संचालक मा.श्री. सोमनाथ डोंबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विषय वाचन व अहवाल वाचन सचिव श्री. कुमार घोडके यांनी केले. शेवटी संचालक तानाजी पवार यांनी आभार मानले. सदर कार्यकमाचे सुत्रसंचालन लेखापाल गजेंद्र जोशी यांनी केले.