रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी खा.निंबाळकर प्रयत्नशील

टीम : ईगल आय मीडिया
पुणे येथे विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा मॅडम, ॲडिशनल डिव्हिजनल मॅनेजर सारेश भाजपे, सीनियर डिव्हिजनल ऑपरेशन मॅनेजर डॉ स्वप्निल नीला, श्याम कुलकर्णी डिविजनल कमर्शियल मॅनेजर, नजीब मुल्ला सीनियर डिव्हिजनल इंजिनीयर, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर श्री श्री निवास उपस्थित होते .
अनेक वर्ष फलटण पंढरपूर रेंगाळलेला रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रयत्न करीत आहेत. गेल्या दोन महिन्यापूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटून सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये मागणी केली होती, त्याप्रमाणे रेल्वेमंत्री यांनी आदेश देऊन फलटण – पंढरपूर रेल्वे सर्वेक्षणाच्या संदर्भात तात्काळ अहवाल मागितला आहे. या बाबत रेल्वेचे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून याबाबत काही अडचणी आहेत का यासंदर्भात बैठक झाली.
लवकरच पुणे ते फलटण रेल्वे सुरू करणेबाबत काहि अडचणी आहेत का ? असतील तर लवकरात लवकर त्या दुरूस्ती करुन लागणारी व्यवस्था निर्माण करावी, व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे शुभहस्ते हा सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. त्याची तयारी कशी असणार ह्या सगळ्या बाबत माहिती घेतली. तसेच माढा तालुक्यातील रेल्वेच्या थांब्याच्या संदर्भामध्ये माजी जि. प. सदस्य शिवाजीराव कांबळे यानी सुचवलेल्या कामाबद्दल चर्चा करून त्यांनी दिलेले प्रस्ताव ते ही मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले..
जुना सर्वे झाल्याप्रमाणे रेल्वे गेली पाहिजे, अशी भूमिका यावेळी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी मांडली. नवीन रेल्वेच्या सर्वेक्षणामध्ये अनेक गावांची गैरसोय होत आहे, यामध्ये अनेक लोकांचे जमिनी, घरे जात आहेत. व्यवसायिक दृष्टी ही गोष्ट योग्य नाही अशी भूमिका ही खासदारांची यांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण अहवाल हा जुन्या सर्वेक्षणानुसार गेला पाहिजे असा आग्रह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धरला.
फलटण – बारामती रेल्वेमार्गाचा आढावा घेतला. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचे हस्तांतरण व जमिनीचा मोबदला याबाबतही बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. त्याच बरोबर फलटण – पंढरपूर मार्ग जुन्या निर्धारित मार्गानेच करावी लागेल, असे सक्त आदेश रेल्वे विभागाला दिले. याचबरोबर भविष्यात प्रस्तावित केलेला हैदराबाद – मुंबई बुलेट ट्रेन मार्ग याच्यावर ही चर्चा झाली.