पंढरीत चप्पल लाईनच्या 4 दुकानास आग

लाखो रुपयांचे नुकसान

आगीच्या दुर्घटनेचा vdo पहा !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील चप्पल दुकान लाईनमध्ये असलेल्या मोबाईल शॉपीसह 4 दुकानास आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे. शहा पेट्रोल पंपा समोर असलेल्या दुकानास ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप समजले नाही.

नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची वाहने आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहेत. या लाईन ला सलग दुकाने असल्याने मोबाईल शॉपी लगत असलेली इतर तीन दुकाने सुद्धा आगीमुळे बाधित झाल्याचे समजते. या आगीत एकूण 4 दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मागील आठवड्यात भोसले चौकात आगीची घटना घडल्यानंतर आज पुन्हा आग लागल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!