13 प्रश्नांची दिली उत्तरे : मोठ्या स्पर्धेत सहभागी होणारे पहिलेच पंढरपूरकर
पंढरपूर : ईगल आय मिडिया
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या गेम शो मध्ये 13 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन तब्बल 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. त्यामुळे या प्राध्यापकांचे अभिनंदन होत आहे.
6 लाख स्पर्धकांतून झाली होती निवड सोनी मराठी वाहिनीवर मोठी लोकप्रियता असलेल्या या शो मध्ये सहभागी होण्यासाठी sony live ap मधून प्ले ऑफमध्ये इच्छुकांशी स्पर्धा करावी लागते. 6 लाखांहून अधिक स्पर्धकातून प्रा. बहादूरे यांची निवड झाली होती, हे विशेष.
सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा गेम शो मोठा लोकप्रिय आहे. या शो मध्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात संख्याशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक असलेले संजीव बहादुरे यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले होते. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी या शो चे प्रसारण झाले आहे.
प्रा. संजीव बहादूरे या शो मध्ये सहभागी होणारे एकमेव पंढरपूरकर आहेत. त्यांनी या शो मध्ये सहभागी झाल्यानंतर मोठी मजल मारली आहे. तब्बल 13 प्रश्नांची उत्तरे देत 25 लाख रुपयांची रक्कम त्यांनी जिंकली आहे. त्यामुळे प्रा.बहादूरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.