पंढरपूर कोरोना पॉझिटिव्हची वाटचाल शतकाकडे

बुधवारी दिवसभरात 24 लोक पॉझिटिव्ह


पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. बुधवारी 24 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ( 88 ) शंभरीकडे निघाली आहे. बुधवारी दिवसभरात पंढरपूर शहरातील 16 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर 7 गावातील 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एका दिवसात विक्रमी 24 पॉझिटिव्ह अहवाल आलेले आहेत.
बुधवारी शहरातील संत पेठ, बागवान गल्ली, भगवान नगर, शांताई नगर, ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, घोंगडे गल्ली आदि परिसरातील संपर्कातील लोक पॉझिटिव आले आहेत. तर ग्रामीण पैकी करकंब, वाखरी, गोपाळपुर, लक्ष्मी टाकळी, गुरसाळे, होळे, पुळुज, गावातील लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाखरी कोविड केअर सेंटर येथे 57 लोकांवर उपचार सुरू आहेत तर 29 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. शहर व तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग व एकूणच प्रशासन अधिक नेटाने प्रयत्न करीत असल्याचे दिसते. त्याचबरोबर नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण असले तरीही, सुरक्षिततेच्या दृष्टीने सावधानता बाळगली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!