पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात आणखी 7 कोरॉना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून शहरातील एकूण कोरूना बाधित यांची संख्या आता 19 झाली आहे. तर करकम्ब 1, खर्डी 1, शेगाव दु.1 असे 22 रुग्ण झाले आहेेेत.
पंढरपूर शहरातील 61 संशयित लोकांचे swab तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 54 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सात लोकांचे अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले होते, त्या सात पैकी 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे या चौघांपैकी एक जण कोरोना बाधित राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षचा मित्र असून दोन रुग्ण लिंक रोड परिसरातील तर एक जण क्रांती नगर भागातील असल्याचे समजते.
शेळवे येथील सर्व दहा जणांचे रिपोर्ट निगेटिव आल्याने शेळवेकरांनी फटाके फोडुन आनंद व्यक्त केला. सर्वांचे फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. शेगाव दुमाला ता.पंढरपुर येथील एका महिलेच्या संपर्कात आलेल्या शेळवे येथील लहान बालकासह १० जणांना काॅरनटाईन केले होते.
एकूण सक्रिय रुग्ण 22 असून त्या पैकी 5 रुग्णांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर 17 रुग्णांवर वाखरी येथील mit कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत. अद्यापही 124 संशयितांचे तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने त्या अहवालाकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.