पंढरपूर कोरोना बाधीतांची संख्या 14

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरात आज नव्याने चार नवीन रुग्ण सापडल्यामुळे शहरातील कॉर्न बाधित यांची संख्या 14 झाली आहे . शहरातील अगोदरचे कोरोनाबाधित 8 आणि ग्रामीण भागात 1 रुग्ण सापडल्यामुळे एकूण बाधित संख्या 9 झाली होती. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी आणखी 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आलेले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 14 झालेली आहे.
पंढरपूर शहरातील एका बँकेचा संचालक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील अन्य 4 लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. याशिवाय शहरातील एका हॉस्पिटलमधील एक कर्मचारी, एका शासकीय अधिकाऱ्यांचा वाहन चालक, एका डॉक्टरची आई असे एकूण 9 रुग्ण शहरात सापडले आहेत. तर करकम्ब येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला आहे. त्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील एकूण संख्या मंगळवारी 9 झाली होती.
दरम्यान, बुुधवारी आणखी 5 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी 4 रुग्ण पंढरपूर शहर आणि 1 शेगाव दुमाला येथील आहे. या रुग्णांवर वाखरी तील एम आय टी covid-19 सेंटर येथे उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!