पंढरपूर तालुक्यातील 39 अहवाल मिळाले


प्रांत अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी यांचाही अहवाल प्राप्त

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहर व तालुक्यातील swab तपासणीचे प्रलंबित अहवालापैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत आणि ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पंढरपुरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान आणखी चार अहवाल येणे प्रलंबित असून त्यामध्ये काही डॉक्टर्स चे अहवाल येणे अपेक्षित आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 27 झालेली आहे. 3 जुलै रोजी swab घेतलेले 124 अहवाल येणे प्रलंबित होते.त्यामुळे या अहवालाकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!