मनसे चे माप राष्ट्रवादी च्या पारड्यात

विधानसभा पोटनिवडणूकीत मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके  यांना पाठिंबा देऊ केला आहे. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली.

मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही. तर मनसेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे आणखी जड झाले आहे.


राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आज भगीरथ भालके यांच्या प्रचारथ॔ प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचार फेरी काढून मतदाराची गाठी – भेटी घेत होम टू होम प्रचार करण्यात आला. यावेळी मनसे चे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, नागेश यादव, तालुका अध्यक्ष मनसे शशिकांत पाटील, दुरयोधन यादव, पंढरीनाथ कदम. अँड बादल यादव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!