जे पंढरपूर नगरपालिकेस जमले नाही : ते या संघटनेने केले

कृत्रिम तलावात दहा हजार गणेशमूर्तीचे विसर्जन !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

दरवर्षी गणेशमूर्ती विसर्जित केल्याने चंद्रभागा नदीचे प्रदूषण वाढते म्हणून पंढरपूर नगरपालिका कृत्रिम तलाव करून त्यामध्ये गणेश भक्तांनी मूर्ती विसर्जित कराव्यात असे आवाहन करीत असते मात्र पालिकेच्या आवाहनास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यंदा मात्र मनसेच्या वतीने अभिनव उपक्रम राबवून तब्बल 10 हजाराहून अधिक मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले. त्यामुळे यंदा प्रथमच चंद्रभागा प्रदूषण विरहित दिसू लागली आहे. पंढरपूर नगरपालिकेस जे शक्य झाले नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने करून दाखवले आहे. त्यामुळे मनसेच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी चंद्रभागा आपल्या दारी या उपक्रमातून शहरातील गणेश भक्तांना गणेश मूर्ती विसर्जन करण्याची सोय उपलब्ध करुन दिली होती. 30  विसर्जन रथ तयार केले होते. या रथामध्येच चंद्रभागेच्या पाण्याचे कृत्रिम तलाव तयार केले होते.

दिवसभर सुमारे दहा हजाराहून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे या  रथामध्ये विसर्जन करण्यात आले. त्यानंतर  निर्माल्य आणि गणेशमूर्तीचे विधीवत मोठ्या शेततळ्यातील पाण्यात विसर्जन कऱण्यात आले. प्रर्यावरण प्रेमींकडून देखील मनसेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, प्रताप भोसले, महेश पवार, इत्यादी उपस्थित होते

  दरवर्षी चंद्रभागेच्या पाण्यात गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. यामुळे नदीचे प्रदुषण होते. त्यातून लोकांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होते. नदीपात्रात अस्वच्छता निर्माण होेते. नदीचे प्रदुषण कमी व्हावे आणि कोरोनाचा संसर्ग देखील कमी व्हावा .यासाठी मनसेनेच्या वतीने चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम राबवला. यामध्ये दहा हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन कऱण्यात आले. पर्यावरण पूरक आणि प्रदुषणमुक्त गणेश उत्सव साजरा व्हावा हिच आमची भूमिका होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. :- दिलीप धोत्रे,
प्रदेश सरचिटणीस,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी काॅपर, चुना व विविध रासयनिक रंगाचा वापर केला जातो. गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जन केल्यामुळे नदीचे जवळपास दरवर्षी 70 ते 80 टक्के प्रदुषण होते. मनसेच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमामुळे येथील चंद्रभागानदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण कमी कऱण्यास मदत झाली आहे. दरवर्षी शहरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन चंद्रभागानदी पात्रात केले जाते. रासायनिक रंग आणि प्लाॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे  चंद्रभागेचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते. यंदा मात्र मनसेच्या चंद्रभागा आली आपल्या दारी या  उपक्रमामुळे चंद्रभागेचे प्रदुषण रोखण्यास मदत झाली आहे.

  • अरविंद कुंभार,
    पर्यावरण प्रेमी,
    सोलापूर

Leave a Reply

error: Content is protected !!