पंढरपूर मार्केट कमिटी निवडणूक : परिचारक गटाचे उमेदवारी अर्ज उद्या दाखल होणार

एक व्यक्ती एक पद : परिचारक गटाचा निवडणूक पॅटर्न

पंढरपूर : eagle eye news

  तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देताना परिचारक गटाकडून एक व्यक्ती एक पद हे धोरण राबवले जाण्याची शक्यता आहे.  शनिवारी पंतनगर येथे झालेल्या परिचारक गटाच्या बैठकीत उमेदवार निवडीचे सर्वाधिकार माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे देण्यात आले आहेत.  सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी परिचारक गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.  या बैठकीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह उमेश परिचारक, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे आदी प्रमुख नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.


 पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असून, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी परिचारक गटाची उमेदवार निवडीसंदर्भात बैठक पंतनगर येथे शनिवारी संपन्न झाली. यावेळी विविध व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार माजी आमदार प्रशांत परिचारक व युरोपियन  शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक यांना दिले आहेत.


यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना प्रशांत परिचारक  यांनी, पूर्वी ज्या कार्यकर्त्याला अन्य कुठे संधी मिळाली नाही अशा उमेदवाराचा विचार केला जाईल. सध्या पांडुरंग परिवारातील संस्थेवर जे कार्यकर्ते संचालक म्हणून काम करत आहेत, किंवा यापूर्वी ज्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये संधी मिळालेली आहे, अशा कार्यकर्त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत संधी मिळणार नाही. ज्यांना आजवर कोणत्याही निवडणुकीत, कुठल्याही संस्थेवर संधी मिळालेली नाही,अशा कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.  सोमवारी सर्व उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील.  परिचारक गटाकडून ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निरोप येईल, त्यानेच अर्ज दाखल करावा,अशा सूचना यावेळी माजी आम. प्रशांत परिचारक यांनी केल्या. 

विरोधी गटाकडून सपशेल माघार ?

विरोधी विठ्ठल  परिवाराकडून निवडणूक लढवण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. विरोधी गटाच्या काही नेत्यांकडून आम्ही या निवडणुकीसाठी काहीही प्रयत्न करणार नसल्याचे निरोप आले आहेत, असे समजते. त्यामुळे बाजार समितीच्या या निवडणुकीत विरोधी विठ्ठल परिवार अथवा  कोणत्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता दिसत नाही. पांडुरंग परिवाराचे उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता बळावली आहे.


 यावेळी कर्मयोगी सुधाकरपंत साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, ज्येष्ठ संचालक दिलीप चव्हाण, वसंतराव देशमुख, दिनकर मोरे, हरीश गायकवाड. लक्ष्मण धनवडे, प्रशांत देशमुख, सुरेश देशमुख, उद्धव बागल, चंदू फटे,संचालक भास्कर कसगावडे, युवक नेते प्रणव परिचारक, रोहन परिचारक, अर्बन बँकेचे संचालक सतीश मुळे, दाजी पाटील, माजी सभापती वामन माने, विवेक कचरे, संचालक तानाजी वाघमोडे, पंडित भोसले, रामदास ढोणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!