हमाल – तोलार गटात ८२ पैकी ८१ मतदारांनी मतदान केले.
पंढरपूर ; ईगल आय न्यूज
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी चुरशीने ९८ टक्के इतके मतदान झाले आहे.बाजार समितीसाठी एकूण ३ हजार ४२९ मतदार होते, त्यापैकी ३ हजार ३६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्ताधारी परिचारक गटासमोर विठ्ठल सहकाराचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दंड थोपटले असल्याने बिनविरोध होण्याच्या मार्गावर असलेली हि निवडणूक रंगतदार झाली आहे.
उद्या मतमोजणी
बाजार समितीसाठी उद्या ( शनिवारी ) सकाळी ८ वाजल्यापासून शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणी होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी साळवे यांनी दिली.
पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या १८ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झालेल्या आहेत. या पाचही जागा सत्ताधारी परिचारक गटाने जिंकल्या असून १३ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विठ्ठल परिवारातील काळे – भालके – पाटील गटाने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अभिजित पाटील यांनी १३ जागांवर उमेदवार दिल्याने निवडणूक लागली आहे.
केंद्रनिहाय झालेले मतदान खालील प्रमाणे
१) सुस्ते केंद्रावर सोसायटीच्या ३७७ पैकी ३६८ मतदारांनी मतदान केले. तर ग्रामपंचायत गटात १७४ पैकी १७३ जणांनी मतदान केले. २) भाळवणी केंद्रावर सोसायटी गटातील ४१५ पैकी ४११ ग्रामपंचायत १७४ पैकी १७२ मतदान झाले. ३) करकंब केंद्रावर ग्रामपंचायत गटात १२५ पैकी १२४ तर सोसायटी गटात ३४४ पैकी ३३१ जणांनी मतदान केले. ४) अनवली केंद्रावर ग्रामपंचायत गटात १६९ पैकी १६७ तर सोसायटी गटात ४२८ पैकी ४२६ मतदारांनी आपला हक्क बजावला. ५) भोसे केंद्रावर सोसायटी गटात ३७० पैकी ३५७ तर ग्रामपंचायत गटात १७८ पैकी १७३ सदस्यांनी मतदान केले. पंढरपूर केंद्रावर सोसायटी गटात ३९३ पैकी ३८४ तर ग्रामपंचायत गटात १९९ पैकी १९७ मतदारांनी मतदान केले. हमाल – तोलार गटात ८२ पैकी ८१ मतदारांनी मतदान केले.
७ दिवस प्रचार शांततेत पार पडल्यानंतर पंढरपूर, भोसे, भाळवणी, करकंब, अनवली सुस्ते या सहा केंद्रांवर शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदान सुरु झाले. मोठ्या चुरशीने सकाळी ११ वाजेपर्यंतच ५० टक्के मतदान झाले होते. सकाळच्या टप्प्यातच मतदानासाठी केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. कुठेही वादावादी, किंवा तणावाचे प्रसंग निर्माण झाले नव्हते. सर्वत्र शांततेत मतदान झाले. सायंकाळी वाजेपर्यंत ९६ टक्के मतदान पूर्ण झाले होते.