राष्ट्रवादी उद्योग आणि व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांची माहिती
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पदभार घेतल्या नंतर विदर्भ, खानदेश, मराठवाडा दौरा केला असून यावेळी विविध भागातील एम आय डी सी ची माहिती घेतली आहे. पंढरपूर तालुक्यातही एम आय डी सी करिता पोषक परिस्थिती असून आपला एम आय डी सी साठी पाठपुरावा चालू आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापार आणि उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.श्री.शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पुणे येथे भेट घेवून उद्योग व व्यापार विभागाचा कार्य अहवाल प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सादर केला. यावेळी सहकार शिरोमणीचे चेअरमन मा.कल्याणराव काळे, विठठल सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन लक्ष्मणआबा पवार, पंढरपूर ता . राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याण कुसमडे उपस्थित होते.
नागेश फाटे यांनी खानदेश, विदर्भ, मराठवाडा विभागाचा दौरा करुन पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेऊन अडी अडचणी जाणुन घेतल्या त्यांचा कार्य अहवाल आज सादर केला.पंढरपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार यांच्या करीता पंढरपूर तालुक्यामध्ये एम.आय.डी.सी.स्थापन करणेबाबत संबंधीत विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे फाटे यांनी सांगितले.