सर्व अपघातग्रस्त पंढरपूर,आंबे, नरखेड येथील
मयत संदीप कोळी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर कडे येणाऱ्या रिक्षाला मालवाहतूक ट्रकची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले तर 1 जण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
पंढरपूर कडे येणाऱ्या रिक्षा ( क्र. MH-13 AD-0893 ) आणि ट्रक ( क्र. Mh13, cu 5466 ) यांच्यात समोर समोर धडक झाली. मोहोळ येथून टेम्पो पाहण्यासाठी गेलेले हे 4 युवक रिक्षामध्ये बसून पंढरपूर कडे येत होते. त्यापैकी 3 जण ठार झाले आहेत. एक जण गंभीर जखमी असून त्याला लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये नेले असता मयत झाला. तर अन्य 1 जणास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला आहे. अपघातग्रस्त रिक्षातील सर्व प्रवासी एकमेकांच्या नात्यातील असल्याचे समजते. नरखेड, आंबे येथील काही नात्यातील युवक होते. एका मयताचे नाव संदीप कोळी ( वय 24, रा.पंढरपूर ) सुजय विजय कांबळे ( वय 23 वर्षे रा. आंबे, ता. पंढरपूर ) समजते तर सुमित सुनील झुंजार (वय 22 वर्षे, रा. नरखेड, ता. मोहोळ ) अशी जखमींची नावे आहेत.