पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 560
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात आज 14 तर ग्रामीण भागात 5 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, ग्रामीण भागात सरकोली, कासेगाव, लक्ष्मी टाकळी, पुळूज, तुंगत, या गावात नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यातील एकून रुग्ण संख्या 560 इतकी झाली झाली आहे.
एकाच दिवशी 56 रुग्ण बरे होऊन घरी : रविवारी वाखरी येथील कोविड केअर सेंटर मधून तब्बल 56 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आरोग्य यंत्रणेचा उत्साह वाढला आहे तर नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. आज प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांच्या सह यावेळी अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी शहर व तालुक्यातील 541 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 560 एवढी झाली आहे.
शनीवारी प्राप्त अहवालानुसार
शहरात नवीन 14 ग्रामीण भागात 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर शहरातील कालिकादेवी चौक, वेदांत भक्त निवास, भाई भाई चौक, डाळे हनुमान मैदान, भोसले चौक, चितळे वाडा, सिद्धिविनायक नगर, संत पेठ, गोविंदपुरा या भागात हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.