पंढरपूर नगरपालिकेचा विकास रथ शहरातून गायब

मोदी सरकार लिहिण्यावर हरकत घेऊन काँग्रेसने अडवला

पंढरपूर : eagle eye news
पंढरपूर नगरपालिकेने शहरात प्रचार करण्यासाठी सज्ज केलेल्या विकास रथाला काँग्रेस पक्षाने तीव्र हरकत घेऊन रथावर भारत सरकार च्या ऐवजी मोदी सरकार लिहिल्यामुळे सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी व सर्व काँग्रेस पदाधिकारी नगरपालिकेत आक्रमक झाले. पालिका प्रशासनास जाब विचारात धारेवर धरले. त्यामुळे दिवसभर हा विकास रथ शहरातून गायब झाल्याचे दिसून आले.

यावेळी जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष समिर कोळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारलं. देशातील सरकार भारताचे आहे कि व्यक्तिगत मोदीचे सरकार आहे असा सवाल उपस्थित करून, केवळ मतासाठी मोदी सरकार असे संबोधण्यात येत आहे, या विकास रथास आमचा विरोध नाही, पण भारत सरकार असे लिहावे अन्यथा हा रथ आम्ही पंढरपूरमध्ये फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना देण्यात आले. त्यानंतर मात्र पंढरपूर शहरामध्ये हा रथ दिवसभर दिसला नाही.


यावेळी समीर कोळी, बलदेव शिकलकर,अश्फाक सय्यद, दिलीप फडतरे, बाळासाहेब आसबे, जमीर मुजावर, श्रीकांत देवकर, गणेश फडतरे ,दिलावर बागवान,मेहबूब बागवान ,मुर्शिद शेख, तुकाराम होरे, गोरखनाथ कदम, युवराज जाधव, रमेश ओहाळ ,बाळा हजारे व सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!