इंधन दरवाढ : पंढरीत राष्ट्रवादीचे आंदोलन

तहसीलदाराना दिले निवेदन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मागील काही महिन्यांपासून दररोज इंधन दरवाढ सुरूच आहे. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच आता घरगुती वापराच्या गॅस दरातही सरकारने वाढ करून आणखी मोठा झटका महिला वर्गाला दिला आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

या वेळी उज्ज्वला गॅस सिलिंडर टाकीला हार घालून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, मजूर आणि कामगार होरपळून निघत आहेत. त्यातच महागाईने उच्चांक केला आहे. यामुळे लोकांना जगणे मुश्‍किलीचे झाले आहे. कोरोनामुळे (Covid-19) सर्वसामान्य लोक अडचणीत असताना त्यात केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून लोकांची लूट सुरू केली आहे.

याचा निषेध म्हणून पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली. यानंतर नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील ,शहराध्यक्ष सुधीर भोसले , जिल्हापरिषद सदस्य अतुल खरात , युवक जिल्हा उपाध्यक्ष बापू शिंदे, युवती जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले, युवक शहर अध्यक्ष स्वप्निल जगताप ,अण्णा पोपळे, राजा भाऊ सुरवसे ,सचिन आदमिले ,गिरीश चाकोते, युवक कार्याध्यक्ष रणजीत पाटील, रशीद शेख ,दत्ता माने, नवनाथ मोरे सचिन सोलंकी, युवक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण राकेश साळुंखे, विशाल सावंत, धीरज टीकोरे, श्याम पवार, मोहम्मद मुलानी, सलीम मुलानी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनिताताई पवार ओबीसी सेल साधनाताई राऊत, रंजनाताई हजारे महिला शहराध्यक्ष संगीताताई माने, प्राजक्ता ताई , परचंडराव, सारिका गायकवाड उपस्थित होते

Leave a Reply

error: Content is protected !!