पंढरपूर पोलिसांनी १० लाख रुपयांचा गुटखा पकडला

टीम : ईगल आय न्यूज

पंढरपूर शहर पोलिसांनी कर्नाटकातून आलेला १० लाख ४ हजार रुपये किंमतीचा गुटखा पकडला आहे. याचबरोबर गुटखा वाहतूक करणारा टेम्पोसुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे. हा गुटखा पुणे इथे विक्रीसाठी जात होता अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक सी व्ही केंद्रे यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कर्नाटकातून गुटखा घेऊन एक टेम्पो पंढरपूरातील भक्ती मार्गावरून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा लावून टेम्पो ( क्र. एम एच १२, टी व्ही ३९३६ ) थांबवला असता त्यामध्ये सदरचा गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत १० लाख ४ हजार रुपये तर टेम्पोची किंमत सुमारे ७ लाख रुपये असा एकूण १७ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी व्ही केंद्रे, सह पो फौ . राजेश गोसावी, सुरज हेंबाडे, शरद कदम सुनील बनसोडे, दादा माने, राकेश लोहार, सचिन हेंबाडे, सुजित जाधव या पथकाने हि कारवाई केली.

Leave a Reply

error: Content is protected !!