कोरोनामुक्त झालेल्या 8 रुग्णांना आज डिस्चार्ज
पंढरपूर : ईगल आय मीडिया
” पॉजीटीव्ह ” या शब्दाची धास्ती घेतलेल्या पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी एक ” पॉझिटिव्ह ” बातमी असून तालुक्यातील कोरोनामुक्त झालेल्या 8 व्यक्तींना आज mit कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता या व्यक्तीना प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत सहर्ष निरोप दिला जाणार आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातील 27 रुग्ण सध्या mit कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ( गुरुवारी ) त्यांना घरी सोडण्यात येणार आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
आज सकाळी 11 वाजता या 8 नागरिकांना प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत डिस्चार्ज दिला जाणार आहे. वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून आजवर 7 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. आणखी 8 रुग्ण घरी जात असल्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कामाचे कौतुक होत आहे.
” 14 दिवस होम क्वारंटाईन “
बाहेर फिरले तर गुन्हा दाखल होणार
कोरोनामुक्त झालेल्या या 8 जणांना घरी सोडण्यात येत असले तरी त्यांना पुढील 14 दिवस घरीच क्वारंटाईन व्हावे लागेल अशीही माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 14 दिवसात हे नागरिक पुन्हा घराबाहेर फिरताना आढळून आले तर त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.