पंढरपूर चे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची बदली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मागील साडे तीन वर्षे पंढरपूर चे प्रांताधिकारी म्हणून सेवा बजावत असलेले सचिन ढोले यांची बदली पुणे येथे झाली आहे. त्यामुळे आता नवीन प्रांताधिकारी म्हणून कोण येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

व्हीडिओ : प्रांताधिकारी ढोले यांची बदली झाली, आणि म्हातारी धावत पळत ऑफिसला गेली !

प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी डिसेंम्बर 2017 साली प्रांताधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. या काळात त्यांनी सर्व प्रशासकीय विभागात समनव्य साधून लोकाभिमुख काम केले आहे. सर्व सामान्य नागरिकांशी त्यांनी थेट संवाद ठेवला होता.

2 वर्षे महापूर, गतवर्षीची अतिवृष्टी, कोविड महामारी, कोरोना काळातील यात्रा, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, 2019 ची लोकसभा, विधानसभा आणि नुकतीच झालेली विधानसभा पोटनिवडणुकीत ही ढोले यांनी अतिशय चांगले काम केले आहे. साडे तीन वर्षांच्या काळात चौफेर अथक कार्यरत राहूनही त्यांच्याकडून एकही वादग्रस्त घटना घडली नाही.

विशेषतः पालखी महामार्गाचे काम आणि वेगवान भूसंपादन प्रक्रिया केवळ सचिन ढोले यांच्या कार्यक्षमतेमुळे शक्य झाल्याचे मानले जात आहे. 2022 ची आषाढी यात्रा नवीन पालखी महामार्गावरून येणार आहे, आज घडीला 95 टक्के भूसंपादन आणि टप्पा ते वाखरी दरम्यान 80 टक्के महामार्ग तयार झाला आहे. यासाठी प्रांताधिकारी ढोले यांचा पाठपुरावा कारणीभूत असल्याचे दिसते. कोरोना काळातील त्यांचे कार्य, लोकांच्या सोयीसाठी, कोरोना नियंत्रणासाठी त्यांचे नियोजन, कोरोना नियंत्रणासाठीची त्यांची धडपड पंढरपूर नागरिकांना संकटात आधारभूत होती.

गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू असताना काल ( दि.6 ) रोजी पुणे येथे त्यांच्या बदलीचा आदेश निघाला असून दोन दिवसात ते पंढरपूरचा पदभार सोडतील. त्यांच्या जागी आता कुणाची नियुक्ती होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!