परतीच्या पावसाने पंढरपूर तालुक्यास झोडपले

शहरात अतिवृष्टी तर भाळवणी मंडलात केवळ 5 मि मि पाऊस

पंढरपूर : ईगल आय मीडिया

रविवारी परतीच्या पावसाने पंढरपूर शहर आणि तालुक्यास झोडपून काढले असून रविवारी रात्री ते सोमवार पहाटे या दरम्यान तालुक्यातील सर्वच मंडलात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिमी एवढी अतिवृष्टी झाली आहे. तर तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद भाळवणी मंडलात केवळ 5 मिमी एवढी झालेली आहे.

तालुका आज ( दि.12 ऑक्टोबर ) रोजी मंडलनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे.

करकंब 32 मिमी. पट कुरोली 31 मिमी. भंडीशेगाव 35 मिमी. भाळवणी 5 मिमी. कासेगाव,58 मिमी. पंढरपूर 75 मिमी. तुंगत 50 मिमी. चळे 49 मिमी. पुळुज 39 मिमी. सर्व मंडलात झालेला एकूण पाऊस 374 मिमी. असून सरासरी पाऊस 41.55 मि.मी. झाला आहे.

पंढरपूर तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून यंदा पावसामुळे भीमा नदी गेले 4 महिने नियमितपणे दुथडी भरून वाहिली आहे. उजनी धरण 100 टक्के भरले असून पावसाने तालुक्यातील भूजल पातळी उंचावली आहे. अनेक भागात शेतांना पाणी लागले आहे. विहिरी, बोअरवेल वाहू लागल्याचे चित्र आहे. परतीच्या पावसाने पुन्हा तडाखा दिल्याने शेतात उभा खरिपाची पिके पाण्यात जातात की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात उभा राहिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!