पंढरपूर तालुक्यात 17 ग्रामपंचायतीवर आले प्रशासक

30 आणि 31 ऑगस्ट पासून प्रशासकीय कारभार सुरू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

30 आणि 31 ऑगस्ट 2020 रोजी मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काढला आहे.

त्याचबरोबर 30 आणि 31 ऑगस्टपासून तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त होत असल्याने, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, द. सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, करमाळा, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यातील 123 ग्रामपंचायतीची मुदत 30 व 31 ऑगस्ट 2020 पर्यंत संपुष्टात येत आहे. मात्र कोरोना जागतिक महामारीमुळे या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका घेता आलेल्या नाहीत. राज्य शासनाचा 25 जून 2020 रोजीचा निर्णय व आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येत आहे.

पंढरपूर तालुक्यातील या गावात असतील हे प्रशासक

1) विस्ताराधिकारी ए. व्ही नलवडे ( ग्रामपंचायत शेळवे, वाखरी, भाळवणी ) 2) विस्ताराधिकारी एच एस नरळे ( ग्रामपंचायत तनाळी, आंबे, खरसोळी, नेपतगाव,शेगाव दुमाला, केसकरवाडी ) 3) विस्ताराधिकारी एम एन मस्के ( ग्रामपंचायत शिरढोन ) 4) विस्ताराधिकारी एम जी शेळके ( ग्रामपंचायत गादेगाव, सोनके ). 5) विस्ताराधिकारी आर यु डोके ( पोहोरगाव, नारायण चिंचोली ) 6) विस्ताराधिकारी यु वाय साखरे ( ग्रामपंचायत देवडे, चिंचोली भोसे, आव्हे )

या ग्रामपंचायतींचा कारभार 30 ऑगस्टपासून प्रशासक पाहणार आहेत, अशा प्रकारचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काढला आहे.

पंढरपूर तालुक्यातील शेळवे, नेपतगाव, वाखरी, भाळवणी, तनाळी, शिरढोन, सोनके, नारायण चिंचोली, देवडे, चिंचोली भोसे, आंबे, केस्करवाडी, गादेगाव, आव्हे, खरसोळी आणि पोहोरगाव या 17 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत.

विस्ताराधिकारी कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्याकडे ग्रामपंचायतीचे विभागून प्रशासन देण्यात आलेले आहे. त्याबरोबरच मागील पाच वर्षे कार्यरत असलेली ग्रामपंचायतीची सदस्य सरपंच उपसरपंच यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!