पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत साठी इथे स्वीकारले जातील उमेदवारी अर्ज

72 ग्रामपंचायत : 123 अधिकारी, पोलीस बंदोबस्त, 4 ठिकाणी अर्ज दाखल करण्याची सोय

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यात होत असलेल्या 72 ग्रामपंचायतिच्या पंचवार्षिक निवडणूकी साठी आज बुधवार दि. 23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्या दृष्टीने निवडणूक विभागाने तयारी केली असून चार ठिकाणी उमेदवारी भरण्याची सोय केली असल्याची माहिती नायब तहसीलदार एस पी तीटकारे यांनी दिली आहे.

                पंढरपुर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे पंचवार्षिक निवडणूक घेण्यात येत आहे. आज बुधवार दि 23 ते 30 डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. एकाचवेळी तब्बल 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने मोठी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेत प्रशासनाने ही तशी तयारी केली आहे.

1) शेतकी भवन ,पंचायत समिती :- सोनके, तिसंगी, उंबरगाव, बोहली, तनाळी, तपकीरी शेटफळ, शिरगाव, सिद्धेवाडी, खर्डी, तावशी, अनवली, एकलासपूर, कासेगाव, पोहोरगाव, खरसोळी,

2) शासकीय धान्य गोदाम :- शंकरगाव /नळी विटे, फुलचिंचोली आंबे चिंचोली सुस्ते, अजनसोंड, मगरवाडी, तारापूर, शेगाव दुमाला, भटुंबरे, नारायण चिंचोली, देगाव, बाभूळगाव, आढीव, रोपळे, अव्हे/तरटगाव, उंबरे, नांदोरे, करकम्ब, करोळे, कान्हापुरी पेहे, सांगवी / बादलकोट, भाळवणी, केसकरवाडी, धोंडेवाडी, जैनवाडी, शेंडगेवाडी, उपरी, पिराची कुरोली, सुपली, पळशी, वाडी कुरोली, देवडे, उजनी वसाहत,

3) रायगड भवन :- सुगाव भोसे, पटवर्धन कुरोली, चळे, सरकोली, आंबे, भंडीशेगाव

4) तहसील कार्यालय :- शेवते, चिलाई वाडी, भोसे, ओझेवाडी, नेपातगाव, रांझनी, गोपाळपूर, कोंढारकी, मुंधेवाडी, गाडेगाव, शेळवे, वाखरी, शिरढोन, कौठळी, चिंचोली भोसे, खेडभाळवणी

या चार ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी पंढरपुर पंचायत समिती चे शेतकरी भवन, तहसिल चे शासकीय धान्य गोडाऊन, रायगड भवन व तहसीलच्या आवारात आशा 4 ठिकाणी विभाग निहाय उमेदवारी अर्ज भरण्याची सोय उपलब्द करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!