पंढरपूर तालुक्यातील 310 रुग्ण 2 जनांचा मृत्यू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यात मागील 24 तासात 310 लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. आजवरची एका दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णवाढ असून आरोग्य व्यवस्थेवर पुढील काही दिवस मोठा ताण पडणार आहे असे दिसून येते.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक नुकतीच संपन्न झाली आहे, त्यानंतर पंढरपूर शहर आणि तालुक्यातील रुग्ण संख्या दरदिवशी वाढत आहे. यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

पंढरपूर तालुक्यात शुक्रवारी ( 24 एप्रिल ) रोजी 310 रुग्ण आढळले आहेत.शहरात 86 तर ग्रामीण भागात 224 रुग्ण वाढले आहेत. तर जळोली येथील 44 वर्षीय पुरुष आणि भाळवणी येथील 30 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!