पंढरपूर तालुक्यात 309 नवे रुग्ण : 2 रुग्णांचा मृत्यू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यात मागील 24 तासात 309 लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. आजवरची एका दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णवाढ असून आरोग्य व्यवस्थेवर पुढील काही दिवस मोठा ताण पडणार आहे असे दिसून येते.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक नुकतीच संपन्न झाली आहे, त्यानंतर पंढरपूर शहर आणि तालुक्यातील रुग्ण संख्या दरदिवशी वाढत आहे. यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

पंढरपूर तालुक्यात शुक्रवारी ( 23 एप्रिल ) रोजी 309 रुग्ण आढळले आहेत.शहरात 111 तर ग्रामीण भागात 198 रुग्ण वाढले आहेत. तर ईश्वर वठार आणि धोंडेवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

One thought on “पंढरपूर तालुक्यात 309 नवे रुग्ण : 2 रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply

error: Content is protected !!