पंढरपूर शहर आणि तालुक्यातील रुग्ण संख्या आटोक्यात

आज केवळ 54 नवे रुग्ण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या काही दिवसांपासून दररोज 100 हुन अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडणाऱ्या पंढरपूर तालुक्यात या आठवड्यात सलग 100 हुन कमी रुग्णसंख्या आली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना साथ आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे.

पंढरपूर तालुका आणि शहरात गेल्या चार महिन्यापासून दररोज शेकडो कोरोना रुग्ण सापडत असल्याने तालुका कोरोना हॉटस्पॉट बनलेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात 32 हजार 523 पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. तर 595 जनांचा मृत्यू झालेला आहे. यामुळेच यंदाची आषाढी यात्रा सुद्धा प्रतिकामत्मक स्वरूपात पार पडली आहे.

गेल्या 3 महिन्यापासून दररोज 100 हुन अधिक रुग्ण सापडत होते. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णसंख्या चिंताजनक होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आजच्या अहवालात तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या फक्त 54 असून 2 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

सलगपणे रुग्णसंख्या घटत असल्याने तालुक्यातील कोरोना साथ आटोक्यात आल्याचे सुखद चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!