पंढरपूर तालुक्यात कोरोना नियंत्रणात

आजच्या अहवालात केवळ 25 रुग्ण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या पंढरपूर तालुक्यास कोरोना पासून दिलासा मिळालेला आहे. आजच्या अहवालानुसार तालुक्यात केवळ 25 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. तर एकही रुग्ण मृत्यू झालेला नाही.

आजच्या अहवालानुसार तालुक्यात 25 नवीन रुग्ण आढळून आले आहे आहेत, त्यापैकी 20 ग्रामीण भागात तर 5 शहरातील रुग्ण आहेत.आज तालुक्यात एकही मृत्यू झालेला नाही. अद्यापही तालुक्यात 326 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट आता पुर्णपणे आटोक्यात आली असून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाने तयारी केलेली आहे.

पंढरपूर तालुक्यात गेल्या 5 महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळुन आलेले आहेत. एप्रिल,मे महिन्यात तर दैनंदिन रुग्ण संख्या शेकडोंच्या प्रमाणात येत होती आणि दररोज मोठ्या संख्येने मृत्यू होत होते. त्यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात 33 हजार 727 रुग्ण झाले आहेत आणि 630 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेला पंढरपूर हा एकमेव तालुका आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत असून शेकडोंच्या प्रमाणात असलेली रुग्णसंख्या आता डझनावारी झालेली आहे. लवकरच संपूर्ण तालुका कोरोना मुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!