पंढरपूर : 142 पॉजिटीव्ह रुग्ण : 4.37 पॉझिटिव्ह रेट

पंढरपूर तालुक्यात एका दिवसात 3244 कोरोना टेस्ट

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यात आज अनेक गावांमध्ये कोरोना टेस्ट शिबिरे घेऊन तब्बल 3244 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये 142 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे सोमवारी केलेल्या चाचण्यांमध्ये 128 जण पॉझिटिव्ह आढळले होते.


शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने प्रशासकीय यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. त्यानुसार तात्काळ कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गेल्या आठवडाभरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार एकाच दिवसात तालुक्यात रुग्णांचा आकडा दीडशे पार गेल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण तयार होऊ लागले आहे.

आज मंगळवारी सुद्धा तालुक्यातील बहुतांश गावात कोरोना टेस्ट घेण्यात आल्या आहेत. 2 हजार 818 रॅपिड टेस्ट, 426 rtpcr चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये 142 पॉझिटिव्ह लोक आढळून आले आहेत. हा पॉझिटिव्हीटी रेट 4.32 टक्के इतका असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सोमवारी सर्व प्रशासकीय विभागांना आणखी अलर्ट केले असून महत्वाच्या गावात जाऊन कोरोना समितीच्या बैठका घेतल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. याचवेळी गावोगावी कोविड चाचण्यांसाठी शिबीरे घेण्याचे तसेच सर्वे करण्याचे नियोजन केले.


सोमवारी पंढरपूरसह कासेगाव, बोहाळी, गादेगाव, करकंब, वाखरी, तुंगत आदी ठिकाणी कोविड चाचणी शिबिरे घेतली. या शिबिरांना स्वतः प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. संबंधित लक्षणे असलेल्या तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी विनाकारण वेळ न घालवता तात्काळ आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!