पंढरपूर तालुक्यातील 462 रुग्ण मात्र 5 मृत्यू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यात आज कोरोनाचा विस्फोट झाल्याचे समोर आले असून आजच्या अहवालानुसार तालुक्यात तब्बल 462 रुग्ण आढळून आले आहेत आणि 5 जनांचा मृत्यू झाला आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्था मेटाकुटीला अली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पंढरपूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या सतत वाढत आहे. आज मात्र हा आकडा 450 च्या वर च्या गेला आला असून आजच्या अहवालानुसार 462 नवे रुग्ण सापडले आहेत. पंढरपूर तालुक्यात गुरूवारी आलेल्या अहवालात ( 29एप्रिल ) रोजी शहरात 182 तर ग्रामीण भागात 280 रुग्ण वाढले आहेत.

त्याचबरोबर दिवसभरात 5 रुग्ण दगावले आहेत, यापैकी शहरातील 3 तर ग्रामीण भागातील उपरी येथील 2 जनांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आरोग्य व्यवस्थेवर त्याचा मोठा ताण पडला आहे.

आज नवीन 3 कोविड हॉस्पिटल सुरू झाली आहेत मात्र ती संख्या सुद्धा अपुरी पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!