पंढरपूर तालुक्यात नवीन 34 तर शहरात केवळ 3 रुग्ण सापडले
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून तालुक्यातील 100 पैकी 26 गावे कोरोना मुक्त झाली आहेत. शुक्रवारी केलेल्या चाचण्यांचे अहवाल आज जाहिर करण्यात आले आहेत. त्यानुसार पंढरपूर तालुक्यात केवळ 37 नवे रुग्ण सापडले आहेत.
शनिवारच्या अहवालानुसार पंढरपूर शहरात केवळ 3 तर ग्रामीण भागात 34 नवे रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात केवळ 2 रुग्ण मयत झालेला आहे. मागील महिन्यात दररोज 400 ते 500 रुग्ण पंढरपूर तालुक्यात सापडत होते.
या पार्श्वभूमीवर सध्या तालुक्यातील कोरोनाचे प्रमाण खूपच खाली आले असून तालुक्यातील 100 पैकी 26 गावे चक्क कोरोना मुक्त झाली आहेत. 74 गावांतील रुग्णांची संख्या ही आता खूपच कमी झाली आहे. शुक्रवारी घेतलेल्या चाचण्यांचे अहवाल शनिवारी आले आहेत, त्यानुसार तालुक्यात 34 तर शहरात केवळ 3 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन तयारी करीत असल्याचे ही दिसून येते.