पंढरपूर तालुक्यातील कोरोनाबधित 3 हजारांच्या उंबरठ्यावर

शनिवारी नवीन 100 नवीन रुग्ण : भाळवणीत एकाच दिवशी 22 रुग्ण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 3 हजारांच्या उंबरठ्यावर आली असून शनिवारी 100 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ग्रामीण भागात 84 तर शहरात 16 रुग्ण आहेत.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात शनिवारी 100 रुग्ण सापडल्याने तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 2 हजार 935 इतकी झाली आहे.
शनिवारी भाळवणी या गावात सर्वाधिक 22 रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ लक्ष्मी टाकळी येथे 13, अनवलीत 6 कोर्टी 5 शेटफळ 4, वाखरी 3 असे रुग्ण सापडले आहेत. गाडेगाव, सुस्ते, आंबे, पळशी, गुरसाळे, गोपाळपूर, देवडे, भोसे, चळे, भांडीशेगाव, नांदोरे, ईश्वर वठार, करकम्ब, ,तुंगत, कासेगाव, चिंचोली भोसे, पिराची कुरोली या गावामध्ये नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
कोरोनाचा आता ग्रामीण भागात जोर असून नवीन रुग्ण वाढीचा वेग चिंताजनक झालेला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!