कासेगावात अतिवृष्टी : रात्रीत १२८ मिलिमीटर पाऊस
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यात शुक्रवारी रात्रीदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. कासेगाव मंडल मध्ये सर्वाधिक १२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रात्रीच्या दमदार पावसाने पंढरपूर तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
पंढरपूर तालुक्यात आत्तापर्यंत ५४३ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गुरुवारी खर्डी, बोहाळी, उंबरगाव, गादेगाव भागात तुफान पाऊस झाला होता. त्यानंतर ओढे-नाले हे दुथडी भरून वाहू लागले होते. शुक्रवारी रात्री कासेगाव, भाळवणी, पुळुज या भागात दमदार पाऊस झाला.
पंढरपूर शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे पाणी पातळी वाढले आहे. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष, डाळिंब बागायतदार चिंतेत आहेत. शेत जमीन वाफशावर येत नसल्याने रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता असून, यंदा पेरण्या लांबणार आहेत.
पंढरपूर तालुका १८ सप्टेंबर रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार:
करकंब 10मिमी
पट कुरोली 5मिमी
भंडीशेगाव 21मिमी
भाळवणी 42मिमी
कासेगाव 128मिमी
पंढरपूर 58मिमी
तुंगत 20मिमी
चळे 71मिमी
पुळुज 80मिमी
आज अखेर सरासरी पाऊस 543.15 मिलिमीटर