मात्र 6 मृत्यू झाल्याने तालुक्यावर शोककळा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यात आज काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या 6 एवढी चिंताजनक झाली आहे. मागील 24 तासात तालुक्यात एकूण 299 लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मृतांमध्ये 4 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.
गेल्या तीन दिवसांत सलग 309, 310 आणि 333 रुग्ण सापडले असताना आज मात्र हा आकडा 300 च्या खाली आला असून 299 नवे रुग्ण सापडले आहेत.
सोनके येथील 65 वर्षांची स्त्री, इसबावी येथील 56 वर्षांची स्त्री, सुपली येथील 50 वर्षांचा पुरुष, शिरगाव येथील 55 वर्षांची स्त्री, संतपेठ येथील 65 वर्षीय स्त्री, वाखरी येथिल 55 वर्षांचा पुरुष असे 6 जण मयत झाले आहेत.
पंढरपूर तालुक्यात सोमवारी आलेल्या अहवालात ( 26 एप्रिल ) रोजी शहरात 116 तर ग्रामीण भागात 183 रुग्ण वाढले आहेत. मात्र काल दिवसभरात 6 रुग्ण दगावले आहेत, यामध्ये 4 ग्रामीण भागातील तर 2 शहरातील आहेत.
जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या तुलनेत पंढरपूर तालुक्यातील मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे.