तालुक्यातून १० जिल्हा परिषद सदस्य निवडणून जाणार
पंढरपूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गण रचनेची अधिसूचना काल २ जून रोजी जाहीर झाली असून यामध्ये पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन गट तर पंचायत समितीच्या नवीन चार गणांची निर्मिती झालेली आहे. दरम्यान या गट आणि गणांच्या निवडस हरकत घेण्यासाठी ६ जूनपर्यंत मदत देण्यात आलेली आहे.
पंढरपूर तालुक्यात यापूर्वी जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीचे सोळा गण होते. मात्र वाढीव लोकसंख्या आणि नव्या अधिसूचनेनुसार आता दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गण यांची भर पडलेली आहे. त्यामुळे आता तालुक्यातून जिल्हा परिषदेत दहा सदस्य निवडून जाणार आहेत. आणि पंचायत समितीला २० सदस्यांना संधी मिळणार आहे. पुळुज व गुरसाळे हे नवीन गट झाले आहेत. यामध्ये आहेत तर पंचायत समिती गणांमध्ये देगाव, चळे, मेंढापूर व भंडीशेगाव या चार गणांची वाढ झालेली आहे.
गुरसाळे जि प गटात गुरसाळे सह टाकळी, खेडभोसे, चिंचोली भोसे, व्होळे, देवडे, सुगाव खुर्द, आजोती, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, उजनी वसाहत, अव्हे, वाडीकुरोली आणि नांदोरे या १४ गावांचा समावेश आहे. तर पुळूज जि प गटात पुळूज सह फुलचिंचोली, सुस्ते, मगरवाडी, तारापूर, पुळूजवाडी, शंकरगाव, आंबेचिंचोली, विटे, पोहोरगाव, खरसोळी या ११ गावांचा समावेश आहे.
तर नवीन झालेल्या चळे पंचायत समिती गणात चळे, आंबे, सरकोली, ओझेवाडी या ४ गावांचा समावेश आहे.
देगाव पंचायत समिती गणामध्ये आढिव, शेगाव दुमाला, भटुंबरे, देगाव, मुंढेवाडी या ५ गावांचा समावेश आहे. भोसे जिल्हा परिषद गटामध्ये नव्याने मेंढापुर पंचायत समिती गण निर्माण झाला आहे. यामध्ये मेंढापुर, बारडी, जाधववाडी, खरातवाडी, चिलाईवाडी, पांढरेवाडी, बाभूळगाव या ७ गावांचा समावेश आहे. भंडीशेगाव पंचायत समिती गणात भंडीशेगाव, कोठाळी, शिरढोन, खेडभाळवणी, शेळवे या ५ गावांचा समावेश आहे.