सर्वच मंडलात पावसाची हजेरी : एकूण 262 मिमी बरसला
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपुर तालुक्यात काल दिवसभरात सर्वदूर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. मागील महिन्याभरात तालुक्यात पावसाने दडी मारली होती, तर उजनी धरणाची वाढ ही संथ गतीने सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मागील 4 दिवसांपासून तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाले असून सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.
तालुक्यात काल ( गुरुवारी ) दुपारनंतर पावसाचे आगमन झाले. सर्वाधिक पाऊस पंढरपुर शहरात नोंदवला गेला असून त्या खालोखाल भांडीशेगाव मंडलात 40 मिमी एवढी नोंद झाली आहे. चळे मंडलात ही 37 मिमी एवढा समाधानकारक पाऊस झाला आहे. सर्वात कमी पटवर्धन कुरोली सर्कलमध्ये पाऊस झाला आहे.
रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब 28मिमी
पट कुरोली 14 मिमी
भंडीशेगाव 40 मिमी
भाळवणी 27 मिमी
कासेगाव 27 मिमी
पंढरपूर43 मिमी
तुंगत 30मिमी
चळे 37 मिमी
पुळुज16मिमी एकूण पाऊस 262 मिमी सरासरी पाऊस 29.11मि.मी.
काल दिवसभर तालुक्यात एकूण 262 मिली मीटर पाऊस नोंदवला गेला आहे. अद्यापही पावसाचे चांगले वातावरण असल्याने पुढील दोन ते चार दिवस पाऊस तळ ठोकून राहील अशी शक्यता व्यक्त होत आहे.