पंढरपुर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील सर्वच मंडळात मंगळवारी पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील सर्व 8 ही मंडळात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून. एकूण 222 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाचे दमदार आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
मंगळवारी तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस खालीलप्रमाणे आहे.
करकंब 6 मिमी.
पट कुरोली 2 मिमी.
भंडीशेगाव 45 मिमी.
भाळवणी 25 मिमी.
कासेगाव 55 मिमी.
पंढरपूर 49 मिमी.
तुंगत 3 मिमी.
चळे 14 मिमी.
पुळुज 13 मिमी एवढा झाला असून मंगळवारी तालुक्यात
एकूण सरासरी पाऊस 23.55 मि. मी.एवढा पाऊस झालेला आहे. तर 17 जून अखेर सरासरी पाऊस 95.29 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. 17 जून अखेरीस जूनच्या सरासरीइतका पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा जुलै मध्ये पावसाअभावी होणारी पिकांची होरपळ टळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.