संचारबंदी लागणारच : 10 दिवस कडक निर्बंध
पंढरपुर : ईगल आय मीडिया
मागील 4 दिवसांपासून पंढरपूर शहरातील संचारबंदी टाळण्याचे सर्व स्तरावर सुरू असलेले प्रयत्न फोल ठरले आहेत. जिल्हाध्य8 मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यातील 5 तालुक्यात 10 दिवस संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांतून तीव्र असंतोष पसरला आहे. ही संचारबंदी झुगारून देण्याचा व्यापाऱ्यांनी निर्धार व्यक्त केला असून उद्या काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोना कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे नवे आदेश या पाच तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आहेत.
त्यानुसार 5 तालुक्यातील अत्यावश्यक सेवा संध्याकाळी चार पर्यंत सुरू राहणार, बिगर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद राहणार बागेत. मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्ण पणे बंदी असून विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
मात्र, पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांसह राजकीय पातळीवर मोठा विरोध झाल्याने आज काही प्रमाणात प्रशासनाने माघार घेत अमर्याद काळासाठी जाहीर केलेली संचारबंदी 10 दिवसांवर आणली आहे. तरीही व्यापाऱ्यांना आणि सामान्य विक्रेत्यांना, राजकीय नेत्यांना ही संचारबंदी मान्य नाही. त्यामुळे संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे.