तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 585
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात आज 21 तर ग्रामीण भागात 5 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर शहर व तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या 585 एवढी झाली आहे.
पंढरपूर शहरातील इसबावी, , भाई भाई चौक, डाळे हनुमान मैदान,कालिकादेवी चौक, भोसले चौक, संत पेठ, गोविंदपुरा, सांगोला रोड, राऊत मळा, खवा बाजार, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, काशी कापडी गल्ली, विवेक वर्धिनी शाळेजवळ, अनिलनगर, झेंडे गल्ली, उत्पात गल्ली या भागात हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.ग्रामीण भागात सरकोली, कासेगाव, लक्ष्मी टाकळी, खेडभोसे या गावात नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यातील एकून रुग्ण संख्या 585 इतकी झाली झाली आहे.
यापूर्वी शहर व तालुक्यातील 560 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर 295 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत तर 273 लोकांवर उपचार सुरू आहेत.