पंढरपूर विधानसभेसाठी ३८ उमेदवारांचे अर्ज

शेवटच्या दिवशी तब्बल ३० अर्ज

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर – विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत एकुण ३८ उमेदवारांचे ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.


दि २३ ते २६ मार्च दरम्यान, शैला गोडसे (आंबेचिंचोली), सचिन शिंदे (आंबे , स्वाभिमानी शेतकरी संघटना), संतोष माने (रा. लेंडवे), संजय माने (रा. कोर्टी), संदीप खरात, काशिनाथ जाधव (रा. कासेगाव), नागेश पवार (ईसबावी), इलियास शेख (रा. वाखरी )आदी आठ जणांचे अर्ज दाखल झाले होते.

मंगळवारी शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून भगिरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे यांनी अर्ज दाखल केले. यासह समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्वर आवताडे, परिचारक समर्थक नागेश भोसले यांचेसह अब्दुल मुलाणी (पंढरपूर), संजय पाटील (ब्रम्हपुरी), अशोक वाघमोडे (करमाळा), अभिजित आवाडे (सातारा), अमोल माने (धर्मगाव ,मंगळवेढा), सतिश जगताप काकण (इंदापूर), पोपट धुमाळ (बोहाळी),

सुरेखा गोरे (फुरसंगी, पुणे), सिताराम सोनवणे (सोलापूर), सिध्दाराम काकणकी (सिध्दापूर), शितल आसबे (गोपाळपूर), बळीराम बनसोडे (चळे), किशोर जाधव (गोपाळपूर), सुधाकर बंदपट्टे (पंढरपूर), मोहन हाळवणकर (ईश्वरवठार), रामचंद्र सलगर धर्मगाव (मंगळवेढा), कपिल कोळी (सोलापूर), सुदर्शन मसुरे पुसेवाडी, राजाराम भोसले (वाढेगाव), मनोज पुजारी (ब्रम्हपुरी), सुदर्शन खंदारे (पंढरपूर), सिध्देश्वर आवारे (मलिकपेठ), बिराप्पा गोरे (तनाळी), बापू मेटकरी (पाटकळ), बिरुदेव पापरे (झगडेवाडी), गणेश डोंगरे आदींनी अर्ज दाखल केले आहेत.

आज 31 रोजी अर्जाची छाननी तर ३ एफ्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहणार हे निश्चित होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!