छाननीत भालके, अवताडे यांच्या अर्जावरील हरकत फेटाळली

अपक्ष उमेदवार उच्च न्यायालयात जाणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत दाखल केलेल्या राष्ट्रवादी चे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजप चे समाधान अवताडे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार माऊली हलनवर यांनी घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून दोघांचेही अर्ज मंजूर केले आहेत. दरम्यान, या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे हळनवर यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माऊली हलनवर यांनी सांगितले. भाजप चे उमेदवार समाधान अवताडे यांच्या नावे असलेल्या कंपनीला मुरूम चोरी प्रकरणात माळशिरस प्रांतांनी दंड ठोठावला असल्याचाही मुद्दा आपण उपस्थित करणार असल्याचे ही यावेळी हलनवर यांनी सांगितले.

पोटनिवडणूकिसाठी एकूण 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांची छाननी आज करण्यात आली. भगीरथ भालके हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तर समाधान अवताडे हे दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. दोन्ही कारखान्याच्या ऊस पुरवठा सभासद शेतकऱ्यांची एफ आर पी रक्कम थकीत आहे, अध्यक्ष म्हणून या दोन्ही उमेदवारांची जबाबदारी असून हे साखर कारखाना आणि सभासदांचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरवावेत अशी लेखी मागणी अपक्ष उमेदवार माऊली हलनवर यांनी केली.

यावर निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दुपारी 1 वाजता निर्णय देण्याचा अवधी निश्चित केला होता. यावेळी हलनवर यांचा हरकत अर्ज फेटाळून लावला आणि दोन्ही अर्ज वैध ठरवले आहेत. दरम्यान , 38 पैकी 5 अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. यामध्ये बळीराम बनसोडे यांनी अनामत रक्कम पूर्णपणे भरली नाही म्हणून तर शीतल आसबे यांचे वय विधानसभा निवडणुकीस पात्र नसल्याने त्यांचाही अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!