पंढरीत हजारो महिलांच्या उपस्थित रंगला पैठणीचा खेळ


महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणार : अभिजीत पाटील यांची ग्वाही


पंढरपूर  : eagle eye news
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व समृद्धी मळेगावकर यांचा न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम  संपन्न झाला. या कार्यक्रमास हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेतील विजेत्या महिला

त्यानंतर चार तास रंगलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात पहिला क्रमांक मिळवलेल्या सौ.स्वाती प्रतिश चव्हाण (फ्रिज) दुसरा क्रमांक सौ.सविता कृष्णा चव्हाण (LEDटी.व्ही) तिसरा क्रमांक सौ.जयश्री चंद्रकांत क्षीरसागर (कुलर) चौथा क्रमांक सौ.माधव नेताजी नगरे (सोन्याची नथ) पाचवा क्रमांक सौ.शितल आनंद चौगुले (मिक्सर) देत ५१पैठणीसह सोन्याची नथ देऊन महिला स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.


महिला दिनानिमित्त महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. जेष्ठ महिलांपासून अगदी लहानांपर्यंत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी बोलताना, माता-भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले. कधी ही घराबाहेर न पडणाऱ्या या महिलांच्या कार्यक्रमामुळे घराबाहेर पडल्या, मनसोक्त स्पर्धा खेळल्या, नाचल्या, हसल्या बागडल्या हा आनंद द्विगुणीत झाला. पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील महिलांसाठी येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरण व महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहतील अशी ग्वाही अभिजीत पाटील यांनी दिली.


याप्रसंगी  माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, प्रा.डॉ. बी.पी.रोंगे, श्री विठ्ठलच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, जयश्री धनंजय पाटील, सुमित्रा अभिजीत पाटील, डॉ.श्रद्धा कदम , उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे,  अनिता पवार, रश्मी अमर पाटील, माधुरी दिलीप धोत्रे, समाजसेविका शुभांगी भोईटे, दुर्गाताई माने, पूजा अंभगराव, डॉ.संगीता सुरवसे, चारुशीला कुलकर्णी  यासह असंख्य महिला भगिनीनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

Leave a Reply

error: Content is protected !!