115 लोक पॉझिटिव्ह : तालुक्यातील संख्या 900 च्या उंबरठ्यावर
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शनिवार चा दिवस पंढरपूर शहर व तालुक्यासाठी कोरोना ” वार ” ठरला आहे. शनिवारी आलेल्या एकूण अहवालात आजवरचे सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. एकाच दिवसांत शतकापार 115 पर्यंत पॉझिटिव्ह अहवाल निघाले आहेत. शहर व तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाटचाल 1 हजारकडे निघाली आहे
दरम्यान, पंढरपूर शहर व तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 866 इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील भोसे, खेडभाळवणी, सरकोली, लक्ष्मी टाकळी, पिराची कुरोली, रोपळे, तुंगत, मुंढेवाडी, खर्डी, शेगाव दुमाला या गावात 47 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. शहरातील अनिलनगर, संत पेठ, रामबाग, नाथ चौक, महात्मा फुले नगर, महाद्वार, लिंक रोड, कोळी गल्ली, जुना सोलापूर नाका, जुना कराड नाका, इंदिरा गांधी भाजी मार्केट, गांधी रोड,उत्पात गल्ली, काशी कापडी गल्ली उमदे गल्ली, या भागात 31 रुग्ण सापडले आहेत.
भोसे गावात सर्वाधिक 15 रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरात कालिकादेवी चौकात 18 रुग्ण सापडले आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यातील सध्याचा आकडा 866 इतका झाला असून शनिवारी नगर पालिकेने चेस द व्हायरस हे अभियान सुरू केले असेल तरीही शनिवारी शहरात नागरिकांनी रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यास मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला आहे. त्यामुळेच दोन दिवसात 1 हजारच्या वर रुग्ण संख्या जाण्याची शक्यता आहे.