मृत्यूची संख्याही 94 वर
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव दररोज चिंताजनक होऊ लागला आहे. शहर आणि तालुक्यातील एकत्रित रुग्ण संख्या आता 4 हजारापार झाला आहे.शुक्रवारच्या अहवालात ग्रामीण भागात 91 तर शहरात 47 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
पंढरपूर तालुक्यात कोरोना साथीचे जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत उशिरा आगमन झाले. मात्र नंतर अतिशय वेगाने वाढ झाली. सध्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका रुगांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे.
शुक्रवारी शहर आणि तालुक्यातील बाधितांची संख्या 4 हजार 83 एवढी झाली आहे. शुक्रवारी 4 हजाराचा टप्पा पार केला असून मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी शुक्रवारी ही संख्या 94 वर गेली आहे. लॉक डाऊन पाळूनही शहरातील रुग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाही.
पंढरपूर शहराच्या बरोबरीने तर ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने चालू असून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण संख्या होण्याची शक्यता बळावली आहे.