पंढरीत अवैध वाळू वाहतुकीने घेतला महिलेचा बळी : पती गंभीर जखमी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

चंद्रभागा नदीतुन होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकिने मंगळवारी सकाळी एका महिलेचा बळी घेतला तर पती गंभीर जखमी झाला आहे. जयश्री बारले असे मयत महिलेचे नाव आहे.

आज सकाळी प्रकाश बारले आणि जयश्री बारले हे पती पत्नी त्यांच्या स्कुटीवरून नदी पलीकडे असलेल्या 65 एकर मैदानात फिरण्यासाठी गेले होते. तिथून परत येत असताना नवीन पुलावर भरधाव वेगाने वाळू वाहतूक करणाऱ्या वाहणाने या स्कुटिला धडक दिली.

यामध्ये जयश्री बारले यांचा जागीच मृत्यू झाला तर पती प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!