कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाय योजना : काटेकोर अंमलबजावणी होणार
प्रांताधिकारी सचिन ढोले
पंढरपूर : ईगल आय मीडिया
भारतीयांचा सर्वात मोठा दिवाळी सण 2 आठवड्यावर आला आहे. या काळात खरेदीसाठी गर्दी होण्याची आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन पंढरपूर शहर व तालुक्यात काही उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
यासंदर्भात अधिक बोलताना ढोले म्हणाले की, दिवाळी सण लवकरच येत आहे. सध्या नियंत्रणात असलेला कोरोना दिवाळीच्या काळात काही प्रमाणात पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही उपाय योजना आणि निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावा, सार्वजनिक ठिकाणी सक्तीने मास्क वापरावा, स्यानेटाईझरचा वापर करावा. नियमितपणे आरोग्यवर्धक गोळ्या, औषधे घ्यावीत, व्यापारी वर्गाने दुकानात गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना खरेदी शक्यतो घर पोहोच सेवा देण्याची यंत्रणा निर्माण करावी.
एकदम दिवाळीपूर्वी 1 किंवा 2 दिवस बाजारात गर्दी न करता आत्तापासून जमेल तशी थोडी – थोडी खरेदी करावी, अनावश्यक बाहेर फिरणे टाळले पाहिजे,वयस्कर लोकानी अति जनसंपर्क टाळावा .नियमित मेडिसिन घ्यावीत. वृद्धाश्रमात किंवा अनाथालयात ज्या गोष्टी द्यायच्या आहेत त्या तेथील व्यवस्थापक यांच्याकडे द्या, त्या ठिकाणी स्वतः जाऊन वयस्कर व्यक्ति किंवा लहान मुले यांच्या हातात देऊ नका, संसर्गाचा धोका त्यांना होऊ शकतो.
Farmasist Association and IMA च्या पदाधिकाऱ्यांशी बोलून मेडिसिन चा आढावा घेतला जाईल. ऑक्सिजन पुरवठादाराशी बोलून ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित राहील याची दक्षता घेण्यात येईल. नगरपरिषदेच्या मार्फत स्वच्छता ठेवण्याचे नियोजन करण्यात येईल. RAT टेस्टिंग वाढवण्यात येईल. लस येईपर्यंत स्वताच्या रेग्युलर टेस्ट करून घ्याव्यात असेही आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.