पंढरीत पुन्हा एकदा संचारबंदी

शनिवारी मराठा संघटनांच्या आंदोलनामुळे संचारबंदी : जिल्हाधिकारी यांचा आदेश

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मराठा समाजाच्या विविध संघटना च्या वतीने पंढरपूर ते मुंबई अशी मराठा आरक्षण पायी दिंडी यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र कोरोना महामारी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी रात्री 12 ते शनिवारी रात्री 12 या 24 तासात पंढरीत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे या दरम्यान दोन पेक्षा अधिक लोकांना शहरात एकत्र फिरत येणार नाही.

मराठा समाजाच्या विविध संघटनांनी 7 नोव्हेंबर रोजी पंढरीतुन मुंबईपर्यंत आरक्षण मागणी साठी पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पंढरीत या दिंडीसाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना महामारी चालू असून जिल्ह्यात 34 हजारांवर लोकांना याची लागण झालेली आहे. त्यामुळे पायी दिंडीसाठी आलेल्या लोकांमुळे आणखी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 6 नोव्हेंबर च्या रात्री 12 ते 7 नोव्हेंबर च्या रात्री 12 पर्यंत शहरात संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यान संत नामदेव पायरी येथे दर्शन बंद ठेवण्यात येत आहे. मंदिर परिसर,महाद्वार घाट, चौफळा, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, प्रदक्षिणा मार्ग या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

त्याचबरोबर 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान सर्व भागातून येणाऱ्या एस टी बसेस बंद ठेवण्यात येतील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!