धनगड ऐवजी धनगर दुरुस्तीसाठी आग्रही
पंढरपूर : ईगल आय मीडिया
महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आरक्षण कृती समितीच्यावतीने राज्यभरात तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना 1 ऑक्टोबर रोजी लेखी निवेदन देण्यात आले आहेत.
या निवेदनात, धनगर समाजाची आर्थिक , राजकीय, शैक्षणीक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हालाखीची व बिकट झालेली आहे. यामधून धनगर समाजाची उन्नती होणेसाठी यापूर्वीच महाराष्ट्राच्या यादीत धनगर समाजाचा आदिवासी मध्ये समावेश आहे. धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाहीत. ही दुरुस्ती होणेसाठी महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सभागृहात हा मुद्दा चर्चेला घ्यावा.
ठराव बहुमताने मंजूर करून महाराष्ट्राच्या आदिवासीच्या यादीमध्ये अनुक्रमांक 36 वर धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती केंद्र शासनाने करण्यासाठी केंद्रकडे शिफारस करण्यात यावी. केंद्र सरकारने या दुरुस्तीबाबत चे बिल तयार करून संसदेमध्ये मंजूर करण्यात यावे, किंवा संसदेत सादर झालेल्या 325 क्रमांकाच्या बीलामध्ये ही दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे, या दुरुस्ती बाबतचा राष्ट्रपती यांचे मान्यतेने अद्यादेश त्वरित काढण्यात यावा, अशा मागण्या धनगर समाजाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समिती यांचेवतीने पंढरपूर तहसीलदार यांना 1 ऑक्टोबर रोजी हे निवेदन देण्यात आले.
यावेळी आरक्षण कृती समितीचे विठ्ठल नाना पाटील, आदित्य दादा फत्तेपुरकर, सोमा ढोणे, पंकज देवकते, आण्णा सलगर, बालाजी पाटील, संजय लवटे, दादासाहेब लवटे, आण्णा सलगर, शिवाजी देवकते, राहुल तरंगे, विठ्ठल ढगे-पाटील, अरुण चौगुले, अजय नाना खांडेकर, सचिन घोडके आदि समाज बांधव उपस्थित होते.