पंढरीत आणखी दोन कोरोना रुग्ण बाधीतांची संख्या झाली 11

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरात कोरोनाबाधित 8 आणि ग्रामीण भागात 1 रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आलेले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता अकरा झालेली आहे.
पंढरपूर शहरातील एका बँकेचा संचालक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील अन्य 4 लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. याशिवाय शहरातील एका हॉस्पिटलमधील एक कर्मचारी, एका शासकीय अधिकाऱ्यांचा वाहन चालक, एका डॉक्टरची आई असे एकूण 8 रुग्ण शहरात सापडले आहेत. तर करकम्ब येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला आहे. त्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील एकूण संख्या मंगळवारी 9 झाली होती.
दरम्यान, मंगळवारी आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी एक रुग्ण पंढरपूर शहर आणि दुसरा शेगाव दुमाला येथील आहे. या सर्व अकरा रुग्णांवर वाखरी तील एम आय टी covid-19 सेंटर येथे उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मंगळवारी नव्याने swab तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत, त्यामुळे बुधवारी पंढरपूरचा एकही अहवाल येणे अपेक्षित नाही. मात्र पंढरपूर मधील रुग्णांची संख्या दोन आकड्यात गेल्यामुळे प्रशासन अधिक दक्ष होऊन काम करत असल्याचे दिसते. तसेच नागरिकांमध्येही घबराट उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!