जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची घोषणा
सोलापूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात 7 ते 13 ऑगस्ट या दरम्यान लॉक डाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. दूध, मेडिकल वगळता कडक संचारबंदी असणार आहे.
सोमवारीच या संदर्भात ईगल आय मीडियाने वृत्त दिले होते आणि त्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन लागू केला जावा असा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता. त्यावर आज सोलापूर येथे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकार्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सोलापूर चे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, पंढरपूर आणी परिसरा मध्ये येत्या 7 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून म्हणजे 7 तारखेच्या पहाटेपासून 13 च्या मध्यरात्री पर्यंत
लॉकडाऊन लागू होणार आहे.
प्रदक्षिणा मार्ग आणि जास्त प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करन्यात येणार आहे. लॉक परिस्थिती पाहून डाऊनमध्ये तीन दिवसापर्यंत वाढही होऊ शकते. केवळ दूध ,हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत.
ईगल आय मीडियाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब
पंढरीत लॉक डाऊन केला जाणार असल्याची चर्चा मागील आठ दिवसापासून चालु होती. रविवारी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी लॉक डाऊन ची शक्यता नाकारली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी ईगल आय मीडिया संकेतस्थळावर’ 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान लॉक डाऊन ‘ लागू होन्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. तसेच सोमवारी किंवा मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज ( मंगळवारी ) जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करून ईगल आय मीडियाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे.
ओके