राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा दिपक पवारांसाठी एकमुखी ठराव
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पक्ष अडचणींत असताना निष्ठेने काम करणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सर्व पदाधिका-यांनी तालुकाध्यक्षपदी दिपक पवार यांची पुनश्च निवड करून झालेला अन्याय दूर करावा तोपर्यंत कोणताही पदाधिकारी व कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात व प्रक्रियेत भाग घेणार नाही असा ठराव सर्वानुमते हात वर करून करण्यात आला. आज विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तालुका अध्यक्ष बदलासंदर्भात बैठक पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, प्रदेश विद्यार्थी उपाध्यक्ष संकेत ढवळे आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील म्हणाले की, आमच्या संयमाचा अंत पाहू नका याचे गंभीर परिणाम कट-कारस्थान करणाऱ्यांना भोगावे लागतील.जर या निवडीत दुरुस्ती झाली नाही तर प्रसंगी विधानसभा निवडणुकीत देखील मला मैदानात उतरावे लागेल.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले की, युवराज दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवून यात नक्कीच दुरुस्ती करायला भाग पाडू कोणत्याही परिस्थितीत याबाबत तडजोड केली जाणार नाही व मागे हटणार नाही ज्या पद्धतीने तालुकाध्यक्ष पदावरून दिपक पवार यांना हटवले ही पद्धत अतिशय चुकीची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले म्हणाले की, अडचणीच्या काळात कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून कोण अन्याय करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. आज जे लोक मी राष्ट्रवादीचा असे म्हणून घेतात ते सत्तेचा लाभ घेण्यासाठी आज पक्षाचा वापर करत आहेत व त्यासाठी त्यांना निष्ठावंत कार्यकर्ते अडचणीचे वाटत आहेत म्हणूनच असले कटकारस्थान रचले जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले, महिला तालुकाध्यक्ष अनिता पवार ,शहराध्यक्ष संगीता माने ,ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील ,ओबीसी च्या जिल्हाध्यक्ष साधना राऊत, प्रदेश सचिव अरुण आसबे, श्रीकांत शिंदे,शहर उपाध्यक्ष गिरीश चाकोते, युवक शहराध्यक्ष स्वप्निल जगताप,संजय घोडके, तालुका कार्याध्यक्ष प्रवीण भोसले, सरचिटणीस धोंडीराम घोलप, उपाध्यक्ष दिलीप साळुंखे, युवक अध्यक्ष संतोष चव्हाण,सरचिटणीस औदुंबर चव्हाण,किसान सेल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवक सरचिटणीस गिरीष गंगनमले,किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मासाळ यांनी आपले विचार व्यक्त करत दिपक पवार यांना समर्थन दिले..
यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अमरजीत गोडसे,युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी, विद्यार्थ्यी राज्य उपाध्यक्ष संकेत ढवळे, शहर उपाध्यक्ष सुनील जाधव, शहरातील संघटक सचिन कदम, समीर मोरे, शहर सरचिटणीस शशिकांत शेख, जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक सेल मोहम्मद मुलाणी, शहर कार्याध्यक्ष रणजीत पाटील, महिला उपाध्यक्ष सुनिता शेजवळ, कार्याध्यक्ष सुनंदा उमाटे, तालुका कार्याध्यक्ष अनिल मोरे,तालुका संघटक चंद्रकांत जाधव,शिवाजी नाईकनवरे,धनाजी डोंगरे,शहर सचिव सचिन आदमिले, बालाजी कवडे,अनिल मोरे,पदवीधर तालुका उपाध्यक्ष समाधान चव्हाण,सचिन नकाते, सदाशिव भाटेकर,मधुकर मासाळ,सुदाम गायकवाड, रावसाहेब नागणे,हनुमंत बागल,तानाजी पांढरे, किशोर खरडकर,संजय बाबर, बहुसंख्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…